उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या कचऱ्याची गोष्ट
- Sarthak Niwate
- Sep 24, 2019
- 2 min read
Updated: Nov 12, 2019
पुणे शहरात निर्माण झालेला कचरा नेमका जातो कुठे ? हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांनाच असेल ...
गेली तब्बल २४ वर्ष कचऱ्याच्या अवास्तव विळख्यात, उरळी देवाची आणि फुरसुंगी ह्या दोन्ही गावांचा जीव घुसमटतोय... कधीतरी सुजलाम सुफलाम असलेली गावं, आज भरपूर संकटे खांद्यावर घेऊन जीवन ढकलत आहेत. ह्याला करण फक्त एकच राक्षसरुपी वाढणारा कचरा ! इथल्या कचऱ्याचं वास्तव्य दिवसेंदिवस हजारो मेट्रिक टनानं वाढत जाताना आपण पाहतोय.

एकेकाळी गावकरी ज्या भूमीवर शेती करायचे त्याच भूमीवर आज कचऱ्याच्या भडीमारा होतोय. प्लास्टिक व इतर निचरा न होणाऱ्या कचऱ्यामुळे जमिनीची सुपीकता नाहीशी झालीये. १००० एकरापेक्षा अधिक परिसर डंपिंग ग्राउंडने व्यापला आहे. संपूर्ण पुणे नगरीत, दररोज १६०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील १००० मेट्रिक टन कचरा फुरसुंगीच्या कचरा डेपोत आणला जातो.
कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण होत नसल्याने साठत गेलेल्या कचऱ्याचा डोंगर, अक्षरशः २० मीटर उंच आहे. एखाद्या टेकडीसमान साठलेला कचरा प्रचंड प्रदूषणाला पुनर्जन्म देत आहे. उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील लोकसंख्या ४ लाखांपेक्षा जास्त नोंद केली गेली आहे.
पाणी, अशा अत्यावश्यक मुलभूत घटकाची गरज सगळेच जाणून आहोत. दोन्ही गावांमध्ये पिण्याचे पाणी दोन मार्गांनी उपलब्ध होते. एक म्हणजे महानगरपालिकेचे पाण्याचे ट्रक आणि ठिकठिकाणचे सार्वजनिक नळ. एवध्या प्रचंड लोकसंख्यारहित गावांना स्थानिक प्रशासन दररोज फक्त ८० पाण्याचे ट्रक पाठवते. हा सारा परिसर मुबलक पाण्यात जीवन व्यतीत करतोय.

जवळपासच्या परिसरात विहिरी आहेत पण, कचऱ्यापासूनचे दुषित पाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी जास्त असली तरी ते पाणी मात्र आरोग्यासाठी योग्य नाही. विहिरीत हेच भूजल झऱ्यावाटे येते आणि तेच दुषित पाणी विहिरीवाटे लोकांपर्यंत पोहोचत आहे. विहीर हा पाण्याचा पर्याय मात्र असफल ठरतो.
ठिकठिकाणी पाणी साठलेल्या डबक्यात, डासांची व इतर किटकांची पैदास वेग घेते आहे. आरोग्य हा स्थानिक लोकांचा गंभीर विषय बनलाय. वायू प्रदुषणामुळे, दुषित हवा एक वेगळीच दुर्गंधी या परिसरात पसरवते ज्याने संसर्गजन्य रोग होण्याचे मार्ग खुले आहेत. हवेद्वारे होणारे रोग आबालवृद्ध साऱ्यांनाच हानिकारक आहेत. तेथील लोकांमध्ये घास्याचे रोग, फुफुसाचे रोग, पोटाचे आजार व त्वचा रोग जास्तीत आढळून येतात.
निरनिराळ्या रोगांच्या साथी कायमच दिसून येतात. प्रदूषण, दुषित पाणी व हवा यामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. सतत कचऱ्याशी संपर्क होत असल्याने येथील लोकांचे आयुष्य, साधरण मानवी आयुष्याच्या २०% कमी मानले जाते.

उरळी देवाची आणि फुरसुंगीतील सामाजिक समस्या देखील तितक्याच नाजूक आहेत जितक्या आरोग्यविषयक. गावातील तरुण मुलांची लग्न होत नाहीत कारण मुली तयारच होत नाहीत ह्या गावात यायला. गावाचं नाव ऐकताच कोणी पुढील माहिती घेण्यासाठी सरसावत नाही. गावातील तरुण म्हणतात आमच्याकडे जमीन आहे पण, तिची मशागत करण कठीण होऊन बसलयं. गरोदर आईची गावात प्रसूती करणंदेखील तितकसं योग्य नाही. नव्या जन्मलेल्या बाळाला ३-४ वर्षे होईपर्यंत गावापासून दूर ठेवतात. अश्या सगळ्या तेथील सामाजिक समस्या, पुणे शहरा लगतचा हा परिसर सोडला तर, इतर आसपासच्या परिसरात बराच विकास झालाय.
हा तर झाला समस्यांचा भला मोठा पहाड पण, या परिसराच्या विकासासाठी प्रशासनानेदेखील भरपूर धडपड केली. ह्या सगळ्या कोड्यांची उत्तर शोधण्याची, आरोग्याला एका वेगळ्या स्थराला नेण्याची गरज आहे. आता Delta Clean Green Environment घेऊन आले आहेत एक असा उपाय, ज्याने कचऱ्याचा प्रश्न दूर सारला जाईल आणि विकासाचा मार्ग खुला होईल.
- सार्थक निवाते (info.sarthakfeeds@gmail.com)
Comments